कोपरगांव :- प्रतिनिधी देशातील नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन अग्रवाल यांनी शनिवारी संजीवनी उद्योग समुहास भेट दिली त...
कोपरगांव :- प्रतिनिधी
देशातील नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन अग्रवाल यांनी शनिवारी संजीवनी उद्योग समुहास भेट दिली त्यावेळी त्यांनी आजवर भेटी दिलेल्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा सर्वात अग्रगण्य (इनोव्हेटीव्ह) कारखाना असल्याचे मत व्यक्त केले व सर्वच कामांची प्रशंसा केली. याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यांत आला.
प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रास्तविक करत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने १९६० सालापासून केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला व सहकारात प्रथमच देशपातळीवर पॅरासिटामॉल या औषधी प्रकल्पाची कारखान्याने उभारणी सुरू केल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच प्रा. नरेंद्र मोहन अग्रवाल यांचे अधिपत्त्याखाली एन. एस. आय ने मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय गौरवाबददल त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, चीफ केमिस्ट विवेक शुक्ला, चीफ इंजिनियर के. के. शाक्य, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, डिस्टीलरी मॅनेजर राधाकृष्ण जंगले, डेप्युटी चीफ केमिस्ट अनिल राडे, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव यांच्यासह विविध खाते प्रमुख, उप खातेप्रमुख उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत