लोणी(परेश कापसे) श्रीमती सिंधूताई विखे पाटील रणरागिनी महिला मंडळाच्या सदस्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना भेटीसाठी आज सहली...
लोणी(परेश कापसे)
श्रीमती सिंधूताई विखे पाटील रणरागिनी महिला मंडळाच्या सदस्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना भेटीसाठी आज सहलीचे आयोजन जि प माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.
सकाळी लोणी येथून सुरुवात करून वांबोरी येथील महानुभाव आश्रम व कृष्ण मंदिरास भेट दिल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहोटादेवीचे दर्शन घेतले.
त्यानंतर मढी येथे ओम चैतन्य कानिफनाथ मंदिर दर्शन व श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे भेट दिली.याप्रसंगी रणरागिनी महिला मंडळातील सर्व सदस्या उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत