नेवासा(वेबटीम) आज नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या वेळी विठ्...
नेवासा(वेबटीम)
आज नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते
या वेळी विठ्ठल रखुमाईच्या वेशातीलअनुष्का बोर्डे, व कृष्णा तुवर.. यांनी सर्वांचे मन वेधून घेतले. तसेच विविध पारंपारीक वेशभूषा परिधान करून सर्व विद्यार्थी सहभागी झाले.
या दिंडीच्या पालखीचे पूजन पालक ज्ञानेश्वर तुवर, पांडुरंग तुवर, पांडुरंग जाधव, गंगाधर जाधव तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल तुवर व शाळेचे मुख्याध्यापक गावडे सर यांनी केले.
गावात विविध सामाजिक संदेश दिंडीतून देण्यात आले. झाडे लावा... झाडे जगवा., स्वच्छ गाव, सुंदर गाव.. मुलगा मुलगी एक समान, आपल्या मुलाला मराठी शाळेतच घाला.असे विविध संदेश देण्यात आले.
या दिंडीचे आयोजन शाळेतील उपक्रमशील शिक्षिका बोलके दिपाली यांनी केले.तसेच शाळेतील श्री.नरसाळे सरांनी विशेष सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत