राहुरी मतदार संघातील 'या' २२ गावांना व्यायामशाळा साहित्यांसाठी १कोटी १० लाखांचे निधी मंजुर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी मतदार संघातील 'या' २२ गावांना व्यायामशाळा साहित्यांसाठी १कोटी १० लाखांचे निधी मंजुर

  राहुरी(वेबटीम) राहुरी मतदार संघातील 22 गावांना क्रिडा विभागांअंतर्गत व्यायामशाळा साहित्यांसाठी सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजुर झा...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी मतदार संघातील 22 गावांना क्रिडा विभागांअंतर्गत व्यायामशाळा साहित्यांसाठी सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असुन संबधीत गावात या विभागामार्फत साहित्य पोहोच करण्याचे काम चालु झाले असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.


आमदार तनपुरे पुढे म्हणाले की, राहुरी मतदारसंघातुन व्यायामशाळा साहित्यांकरीता ग्रामपंचायती मार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते त्यानुसार पाथर्डी तालुक्यातुन 17 गावांना त्यामध्ये मांडवे,करंजी,खांडगाव,घाटशिरस,जवखेडे,मोहोज खु.,सातवड ,मोहोज बु,डमाळवाडी,कामत शिंगवे,शिंगवे केशव,निंबोडी,वैजुबाभुळगांव,शिराळ,कौडगांव,सोमठाणे खु,तिसगांव तसेच राहुरी तालुक्यातील 5 गावांना वांबोरी,बाभुळगांव,राहुरी खु.,सोनगांव,कणगर या गावांना व्यायामशाळा साहित्यांचा लाभ मिळणार आहे. संबधीत गावांमधील युवक तरुणांची अनेक दिवसापासुन व्यायामशाळा साहित्यांची मागणी आमदार तनपुरे यांचेकडे केलेली होती.


 या मागणीची योग्य ती दखल घेऊन आमदार तनपुरे यांनी शासनाच्या क्रिडा विभागातुन 1 कोटी 10 लाख रुपयांचे व्यायामशाळा साहित्य मंजुर केले आहे. प्रत्येक गावांमध्ये प्रत्येकी    5 लाखाप्रमाणे अतिशय उच्च दर्जाचे हे व्यायामशाळा साहित्य असुन युवक तरुणांनी शरीर सदृढ राहण्यासाठी या साहित्यांचा वापर करावा असे अवाहन आमदार तनपुरे यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, जरी सरकार बदलले असले तरी मतदार संघातील विकास थांबणार नाही. यापुढील काळातही विकास कामे जोमाने सुरुच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यायामशाळांच्या साहित्यामुळे संबधीत गावातील तरुण युवकांनी आमदार तनपुरे यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत