सात्रळ(वेबटीम) "झाडे वाचावा, जीवन वाचावा ", झाडे लावा, झाडे जगवा " अश्या अनेक घोषणा देत पर्यावरणातील समतोल राखण्याचा संदेश ...
सात्रळ(वेबटीम)
"झाडे वाचावा, जीवन वाचावा ", झाडे लावा, झाडे जगवा " अश्या अनेक घोषणा देत पर्यावरणातील समतोल राखण्याचा संदेश देत कोंडाबाई नानासाहेब कडू कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी अभिनव अशी वृक्ष दिंडी काढून ग्रामस्थांची वाह -वाह मिळवली. या मध्ये मोठया संख्येने विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षिका सहभागी होत्या.
या वृक्ष दिंडी द्वारे पर्यावरणातील जीवन वायूंचे महत्व, झाडे लावण्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन वाढण्याची क्रिया, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, वृक्ष महत्व आदी संदेश या दिंडी द्वारे देण्याचा सुंदर असा अविष्कार या विधार्थिनीनी सर्व सामान्यांना दाखविला आहे. नुकत्याच सगळ्या जगाला करोनाच्या विरोधातील लढाई त प्राणवायूचे अर्थात ऑक्सिजन चे महत्व समजले असून पर्यावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढविण्याचे काम फक्त वृक्षच करू शकत असल्याने या वृक्ष दिंडी ने हा संदेश घरो घरी पोहचविण्यात मोठा हातभार लावल्याची चर्चा सर्वसामान्यत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत