राहुरी : वेबटीम मुळा धरणात एक जण बुडाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. संबंधित तरुण हा नगर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आ...
राहुरी : वेबटीम
मुळा धरणात एक जण बुडाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. संबंधित तरुण हा नगर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मुळा धरणात युवकाचा बुडून अंत
नगरच्या सावेडी भागातील भिस्तबाग सावेडी येथील 38 वर्षीय तरुणाचा मुळा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी घडली.
चेतन कैलास क्षीरसागर हा तरुण त्यांच्या काही मित्रांसोबत राहुरी येथील मुळा नगर येथील मुळा धरण परिसरात पोहण्यासाठी आले होते. यावेळी चेतन क्षीरसागर हे पोहण्यासाठी धरणात पोहण्यासाठी उतरले असता त्यास पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो धरणामध्ये बुडाले.
त्यानंतर त्यांच्या मित्रांनी तातडीने स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सलीम शेख यांना फोन करून सदरील घटना कळवली. सलीम शेख, दिलीप बर्डे ,कैलास बर्डे आदींसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वानी चेतन क्षीरसागर यांचा शोध सुरू केला त्यावेळी मुळा नगर येथील स्थानिक होणार पोहणारे विजय माळी ,इंद्रजीत गंगे ,चंदू पवार यांनी पाण्यात सुमारे एक तास शोध घेतल्यानंतर चेतन क्षीरसागर यांचा मृतदेह त्यांना पाण्यात मिळाला या स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत