राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील सराफ व्यावसायिकाच्या घरात घुसून एक तोळ्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम लंपास केल्याप्...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील सराफ व्यावसायिकाच्या घरात घुसून एक तोळ्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली प्रवरा येथील सराफ व्यावसायिक हेमंत सुरेश आंबिलवादे यांच्या राहत्या घराचा दरवाजा लोटून दुपारी ४ वाजता दीपक राजेंद्र भालसिंग, अबिद शाकिर शेख(दोघे.रा.देवळाली प्रवरा) यांनी आतमध्ये प्रवेश करून २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र व ७ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.
दरम्यान राहुरी पोलिस ठाण्यात हेमंत आंबिलवादे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक राजेंद्र भालसिंग, अबिद शाकिर शेख यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर भिताडे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत