राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- कार्यकर्त्यांनी जनतेशी सतत संपर्क ठेवा, तरुणांचे संघटन वाढवा, आगामी निवडणूकीच्या दृष्टीने कामाला लागा असे प्रतिपा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
कार्यकर्त्यांनी जनतेशी सतत संपर्क ठेवा, तरुणांचे संघटन वाढवा, आगामी निवडणूकीच्या दृष्टीने कामाला लागा असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले
आगामी देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.या प्रसंगी बोलताना श्री तनपुरे बोलत होते.
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक काही कालावधीनंतर होणार असल्याने आज माजी खा. तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलावून त्यांच्याशी संवाद साधला.
आगामी देवळाली प्रवरा निवडणूक पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढविणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागा अशी सूचना तनपुरे यांनी केली.
या बैठकीस अण्णासाहेब चोथे, चारुदत्त पवार , दिपक त्रिभुवन, सुनील विश्वासराव , ललित चोरडिया, आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी, प्रदीप गरड, तैनुर शेख,भास्कर कोळसे, खेडकर सर, सुनील कासार, समीर शेख, चांगदेव पवळे,शरद वाळके,नितीन डमाळे, डॉ.ऋषिकेश पवार, आदिनाथ गायकवाड,ऋषि राऊत, संतोष धावडे,विक्रांत पंडित आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठक संपत नाही तोच...
माजी खा. प्रसाद तनपुरे हे कार्यकर्त्यांना नगरपालिका निवडणुकीत बाबत मार्गदर्शन करत असताना अचानक राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक स्थगितीबाबत अद्यादेश धडकला. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला. आता निवडणूक लांबणीवर पडल्याने भरपूर वेळ आहे असे म्हणून निराश होऊन इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी घराकडे वाट धरली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत