देवळाली प्रवरा(प्रतिनिधी) देवळाली प्रवरा सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी आज शुक्रवारी भाऊसाहेब होले व अल्लाउद्दीन शेख सर यांची निवड करण्यात आली....
देवळाली प्रवरा(प्रतिनिधी)
देवळाली प्रवरा सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी आज शुक्रवारी भाऊसाहेब होले व अल्लाउद्दीन शेख सर यांची निवड करण्यात आली.
देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये भाजप तथा विकास मंडळाने घवघवीत यश संपादन करून सर्वच्या सर्व जागांवर १३ जागांवर विजय मिळवला.
सोसोयटी निवडणूकीनंतर आभार सभेत माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी दरवर्षी तज्ञ संचालक म्हणून निवड केली जाईल असे आश्वासित केले होते. त्यानुसार आज भाऊसाहेब होले व अल्लाउद्दीन शेख यांची तज्ञ संचालक पदी निवड केली आहे.
या निवडीनंतर माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी होले व शेख यांचा सन्मान केला.यावेळी सोसोयटीचे चेअरमन राजेंद्र ढुस,व्हा.चेअरमन राजेंद्र पंडित, माजी नगरसेवक सचिन ढुस,प्रशांत मुसमाडे, विशाल मुसमाडे,सचिन कोठुळे, बशीर शेख सर, अभिजित कदम, सोसायटीचे संचालक शहाजी कदम, दिलीप मुसमाडे, संतोष चव्हाण,बाबासाहेब शेटे,सूर्यभान गडाख, सुदाम भांड, मंजाबापू वरखडे, उत्तम मुसमाडे, सुधीर टीक्कल आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल माजी आ.चंद्रशेखर कदम,देवळाली प्रवरा विकास मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर कदम,उपाध्यक्ष शिवाजी काका मुसमाडे, माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,धोंडीभाऊ मुसमाडे, केरु पटारे, सोपान शेटे,सोपान भांड आदींनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत