सात्रळ(वेबटीम) खा. सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेला एक कोटी रुपयांचा भरघोस निधी असलेला सात्रळ तांदुळनेर तांभेरे रस्त्य...
सात्रळ(वेबटीम)
खा. सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेला एक कोटी रुपयांचा भरघोस निधी असलेला सात्रळ तांदुळनेर तांभेरे रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे तसेच वर्क ऑर्डर प्रमाणे न झाल्याने रस्त्यात जागोजागी खड्डे पडले तसेच काही ठिकाणी खचलेला आहे.
दोन एक महिन्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची ही दुर्दशा झाली असून येथून पुढे असलेल्या मोठया पावसात रस्त्यांची काय स्तिथी होईल या बाबद नागरिकांमध्ये चर्चा होत असतानाचे चित्र आढळत आहे.परिसरातील काही सुज्ञ नागिरिकानी या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता सह पहाणी करून रस्त्यातील खड्डे, खचलेला रस्ता, साईड पट्ट्या न भरल्यामुळे साचलेले पाणी इ. प्रश्नांकडे लक्ष वेधले असता कनिष्ट अभियंताकडून समर्पक उत्तरे मिळू शकली नाहीत. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबद नागरिकांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना नजरेस आणून देऊन सुद्धा त्यांचे परस्पर कामाबद्दल दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्यापहिल्याच पावसात एक कोटीचा निधी असलेला रस्ता मनात ठेकेदार व अधिकारी यांच्यातील हितसंबंधाबाबत शंका उत्पन्न होत आहे. रस्त्यातील खड्डे, अपुरे काम, मजबुतीकरण, डांबरीकरण ची लांबी , रुंदी, जुजबी झालेली डागडुजी या प्रश्नाबाबद खा. सुजयदादा विखे यांच्या संपर्क कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अनेक वेळा संबांधित खात्याकडे विचारणा होऊन सुद्धा त्या खात्यातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. सात्रळ तांदुळनेर तांभेरे रस्ता कामाची प्रतवारी सक्षम खात्याकडून तपासणी करण्याची मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
सदर मजबुतीकरण , डांबरीकरण कामाच्या ज़िल्हा नियोजन मंडळाच्या मंजुरी पत्रात नऊ कि. मी. असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता हे ही मंजुरी 4.600 कि. मी. चीच असjल्याचे सांगत असल्याने, एक कोटी रुपयांचा निधी साडेचार कि. मी. रस्त्यासाठी कसा असू शकेल हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत