आंबी(संदीप पाळंदे) रविवारी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण भक्तिमय तयार झाले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी स्टोअर, देवळाली...
आंबी(संदीप पाळंदे)
रविवारी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण भक्तिमय तयार झाले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी स्टोअर, देवळाली प्रवरा येथील अस्मिता रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित ले. विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मिडीयम शाळेच्या चिमुकल्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर आषाढी एकादशी निमित्त शिस्तबद्ध दिंडी काढली. ज्ञानोबा माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले चिमुकले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा आकर्षक पेहराव केला होता. जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अशा जयघोषानी परिसर दुमदुमून गेला. आंबी स्टोअर, कोळसे वस्ती, जावळे वस्ती, म्हसोबा मंदिर अशा मार्गाने दिंडी निघून शेवटी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.
याकामी संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पठारे, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी पठारे, उपशिक्षक सुप्रिया चव्हाण, श्रद्धा निद्रे, पूजा मुसमाडे, रेणुका पोटे, अंजली बेहळे, संदिप चव्हाण, दत्तात्रय पठारे, भागवत पठारे, मीरा पठारे, भास्कर भालसिंग, सुनिल हिंगे आदींनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत