कोपरगाव (प्रतिनिधी) मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले नाव जाहीर केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी...
कोपरगाव (प्रतिनिधी)
मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले नाव जाहीर केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी युवा नेते आकाश संजय नागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार दि. ६ जुलै संगमनेर येथील पक्षाच्या बैठकीत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नामदार बाळासाहेब थोरात यांनी आकाश नागरे यांची निवड जाहीर केली. ते ज्येष्ठ काँग्रेस नेते, शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे यांचे नातू असून रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक आहेत. यासोबतच युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार संजय पोटे यांची कोपरगाव शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे व सुनील साळुंके, रवींद्र साबळे, प्रशांत आहिरे, राजु पठाण, विजय मोरे, नितीन शिंदे यांची जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस कार्यकर्त्यां तर्फे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत