देवळाली प्रवरा(वेबटीम) हर घर तिरंगा या उपक्रमा निमित्त मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठान च्या वतीने सर्व धर्म संभाव चे प्रतिक असलेल्या हज़रत शहा दा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
हर घर तिरंगा या उपक्रमानिमित्त मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठान च्या वतीने सर्व धर्म संभाव चे प्रतिक असलेल्या हज़रत शहा दावल मालिक बाबा र.अ दरगाह मधे भारत स्वतंत्र 75 व्या मोहत्सवानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्तिथि मधे भारत स्वतंत्र संग्रामच्या वीर पुरुषाच्या जीवन चरित्राची माहित विषद करण्यात आली.
दरगाह चे व्यवस्थापक सूफ़ी हज.अकिल बाबा यांनी स्वतंत्र संग्रामा मध्ये भारतातील सूफ़ी संप्रदायाची योगदाना बद्दल माहिती सांगितली त्यानंतर शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी भगत सिंग,राजगुरु आणि सुखदेव यांच्या जीवन चरित्रा वरती विस्तृपत माहिती सांगितली त्यानंतर संपादक समीर माळवे यांनी झांसी ची रानी,मंगल पांडे यांच्या बलिदानावर प्रकाश ताखला.. तसेच प्राध्यापक मुरलीधर तांबे सर यांनी हर घर तिरंगा या उपक्रमा बद्दल माहिती सांगितली
सूत्र संचालन समीर माळवे यांनी केले व आभार रशीद सय्यद यांनी व्यक्त केले..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हजरत शाहदावल मलिक बाबा दरगाह चे सर्व खादीम कमिटी जानमहंमद शेख, बाळासाहेब जोशी, जावेद तांबोळी, मुरलीधर तांबे, शरद टेकावडे, रशीद सय्यद, आप्पासाहेब शेटे, डॉ. प्रशांत नालकर, जावेद शेख, सचिन नालकर, रवींद्र पेरणे, रमेश गाढे, यांनी परिश्रम घेतले,
तर उपस्थित मुसाबाई शेख, शाकीर तांबोळी, अय्यूब शेख, हाजी शेख सहाब, हाजी मन्सूर शेख, हाजी नबी, सुभेदार शेख, रऊफ शहा, बाबाजान शेख, गफ्फार शेख, सिराज सय्यद, मौलाना अबूबकर निजामी, उमर इनामदार, मौलाना रियाज आदी सदस्य व परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत