देवळाली प्रवरा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ते श्री.भद्रा मारुती खुलताबाद पायी दिंडी सोहळ्याचे सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता...
देवळाली प्रवरा
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ते श्री.भद्रा मारुती खुलताबाद पायी दिंडी सोहळ्याचे सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता देवळाली प्रवरा शहरातील मारुती मंदिर येथून प्रस्थान होणार आहे.
देवळाली प्रवरा येथून दरवर्षी खुलताबाद येथील श्री.भद्रा मारुती देवस्थान येथे पायी दिंडी जाते. यंदा दिंडीचे १७ वे वर्ष असून ठिकठिकाणी भाविकांना चहा पाणी, नाश्ता, भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून १५ ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा शहरातील हनुमान मंदिरातून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
या दिंडीत भाविकांनी सहभागी असे आवाहन श्री.भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत