राहुरी/वेबटीम:- प्रेरणा प्रतिष्ठान संचलित,शासन मान्यता प्राप्त राहुरी शहरात प्रथमच सुरू होत असलेल्या सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट या शाखेचा शु...
राहुरी/वेबटीम:-
प्रेरणा प्रतिष्ठान संचलित,शासन मान्यता प्राप्त राहुरी शहरात प्रथमच सुरू होत असलेल्या सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट या शाखेचा शुभारंभ येत्या रविवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी २०२२ रोजी सकाळी १० वा. बिरोबा नगर ,करपे इस्टेट राहुरी याठिकाणी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्वप्नील माने यांच्या शुभहस्ते तर जनरल सर्जन डॉ.अशोक कुसळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट राहुरी शहरात प्रथमच १०वी,१२वी च्या पास, नापास बेरोजगार मुला,मुलींसाठी अल्पदरात नर्सिंग डिप्लोमा कोर्सेस सुरू करत आहे.
या कार्यक्रमास डॉ. प्रवीण कोरडे, रावसाहेब चाचा तनपुरे,डॉ. प्रताप गिरगुणे, रावसाहेब राधुजी तनपुरे, डॉ.भरत पैठणे,डॉ. धनंजय मेहेत्रे, डॉ. संजय भळगट, डॉ.महेश गव्हाणे,भाऊसाहेब पगारे,प्रवीण क्षीरसागर,प्रसाद ढुस, अक्षय तनपुरे,डॉ.कौशिक मेळवणे,डॉ.अशोक जगधने, डॉ. शिंदे एपी, डॉ.जालिंदर घिगे, डॉ. रवी घुगरकर, डॉ.विजय लाहोटी, डॉ. गौतम आहेर, डॉ.कौस्तुभ भागवत,डॉ.अब्दुल सय्यद, अतिक बागवान,ऋषिकेश तनपुरे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या इन्स्टिट्यूट मार्फत डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस यात असिस्टंट नर्स मिडवायफरी १ वर्षांचा तसेच ऑपरेशन थिएटर असिस्टंट १ वर्ष असे कोर्स या इन्स्टिट्यूट मार्फत ठेवले गेले आहे.
या इन्स्टिट्यूट मार्फत अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स,प्राध्यापक वर्ग यांचं मार्गदर्शन,मुला, मुलींसाठी सुरक्षित हॉस्टेलची सुविधा,तसेच राहुरी तालुक्यातील व शहरातील नामांकित हॉस्पिटल मध्ये सरावाची संधी,तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १००% नोकरीची हमी देखील या इन्स्टिट्यूट मार्फत मिळणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन रोनीत चौधरी, तेरेसा साळवे, शोभा जगताप, निहारिका चौधरी, जयश्री साळवे, विनोद लाला पंडित, हरिकेश साळवे, रोनक चौधरी तसेच अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत