समाजात बलात्कार, चोरी, अत्त्याचार वाढत चालले आहे. लोक मानसीकरित्या दुर्बळ होत चाललीय आणि हे होतय मद्यपानामुळे..!! आजचा तरुणच काय तरुणी सु...
समाजात बलात्कार, चोरी, अत्त्याचार वाढत चालले आहे. लोक मानसीकरित्या दुर्बळ होत चाललीय आणि हे होतय मद्यपानामुळे..!!आजचा तरुणच काय तरुणी सुद्धा व्यसनाच्या आहारी गेलेली दिसतेय.
दारू ही आरोग्यासाठी चांगली आहे पण तेवढीच घातकपण आहे. ती किती घ्यावी किती नाही याचा अवेअरनेस लोकांमध्ये अद्यापही नाही. मानवी जीवनात सत्व व तमोगुण असतात हे दोन्ही गुण मानवी मनावर प्रभाव टाकतात.
आज ज्या जलद गतीने मद्यपान केले जात आहे त्याच जलद गतीने समाजात वाईट प्रवृत्ती घर करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे कृषिअधीक्षक श्री भाऊसाहेब बरहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ गावातील महिलांनी दारूबंदीसाठी पाऊल उचलले. महाकाली महिला ग्रामसंरक्षण दल या गटाच्या अध्यक्ष निर्गुणा मोहूरजले यांच्यासोबत असणाऱ्या स्रीयांनी दारु पकडून त्याची होळी पेटवली.
खरंतर वाईट वाटत की एक स्री दारुसाठी पण लढत आहे. दारूमुळे तिच्या संसाराचा झालेला नाश हे तिला करायला भाग पाडते.
एकीकडे सरकार दारू सोडायला सांगते तर दुसरीकडे दारू उत्पादकाला व दुकानदाराला दारू विकण्यासाठी लायसन्स देते. सरकार जास्तीच जास्त महसूल कसा मिळेन ह्याकडे लक्ष देतीय. हद्द तेव्हा झाली जेव्हा सरकारने किराणा दुकानातपण दारू विकण्यासाठी परवानगी दिली. पैसे मिळवण्यासाठी सरकार कोणतीही हद्द पार करतय.
सरकाराने तपासले पाहिजे कोणते उत्पादनाचे स्रोत चांगले आहे आणि त्याकडे लक्ष दिले तर पैसे कदाचित कमी मिळेन पण येणारी तरुण पिढी ही व्यसनाकडे आकर्षित होणार नाही.
दारूना वेगवेगळ्या प्रकारचे नाव देऊन प्रसारमाध्यमांच्या द्वारे दाखवले जाते.बरेच जण या जाहिरातींना बळी पडून व्यसनाच्या आहारी गेल्याचेही दिसते. खरतर प्रसारमाध्यमांनी नेशेविरुध्द प्रचार केला पाहिजे.
16 वर्षाचा मुलाला दारुचे व्यसन लागले आहे आणि हे वास्तव्य आहे.ज्या देशातील तरुण आतून पोकळ असेन त्या देशाची प्रगती कशी होईल?आजची तरुणपिढी अशी असेल तर भारत कसा महासत्ता बनणार??
महापुरुषांच्या जयंतीला दारू पिऊन डीजे वरती नाचणारे लोक आहेत. त्यांच्या गड-किल्यावर जाऊन दारू पेयाला ही माघे सरत नाही.
दारूबंदी केल्यावर सरकारला ६०० कोटी दिले जाते आणि न करण्यासाठी १०० कोटी. साधं लॉजिक आहे, दारुची किंमत चार ते पाच पटीने वाढते आणि दारुडा माणूस दारू कितीही महाग असेल तरी घेतो.
दारू पिऊन माणूस वाटणं ते वाईट कृत्य करतो. जे दारूचे सेवन करतात ते पापी आहेत " गांधीजी मद्यपनाच्या विरोधात म्हणले होते", मद्याकडे जाणे म्हणजे जळत्या भट्टीत किंवा पूर आलेल्या नदीत जाण्याइतक धोकादायक आहे.
मद्य पिणारा एकदाच मरण पावतो पण त्याचे कुटुंब रोज मरते.
दारु ही मुलांचे डोक्यावरचे छत्र, बायकोचा आधार आणि आपल्या आई बापाची म्हातारपणाची काठी हिसकावून घेते. पैसे अभावी बायकोचे दागिने, घरातील वस्तू एवढेच काय तर त्याची जमीनही दारूमुळे विकतो. दारू माणसाला शक्तीहीन बनवते.
बायकोला होणारी मारहाण, अपशब्द ह्याचा थेट परिणाम मुलांवरती होतो. ज्या घरातील व्यक्ती किंवा कर्ता पुरुष हा व्यसनाच्या आहारी गेलेला असतो बऱ्याचदा त्या घरातील मुलेही त्या व्यसनाच्या आहारी जातात.
दारूमुळे ना बाप-लेकांमध्ये प्रेम असते न जिव्हाळा , ना संस्कृती जपली जाते.
अवैध दारू विक्रीतून पोलिसांना हप्ते मिळतात. सर्वसामान्य लोक महागडी दारू पिऊ शकत नाहीत म्हणून ते देशी दारू पितात. कधी ती विषारीही असते. त्यामुळे अनेक प्रकारचे रोग माणसाला होतात. खूपजण आपला जीव गमावतात.
भारतात ३०% लोक मद्यप्राशन करतात.
दारूविक्रीबाबत भारत तिसरा मोठा देश आहे. दरवर्षी ६ ते ८ टक्क्यांनी मद्यपींची संख्या वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे.
ग्रामीण भागांतील लोक ४५% उत्पन्न फक्त दारूवर उडवतात.
२०% लोकांचा मृत्यू हा दारूपिऊन गाडी चालवल्याने होत आहे.
दारुची सवय एवढी बेक्कार आहे की, सहजपणे सुटत नाही. प्राण जातो पण दारुची तहान काही भागत नाही.
दारू पिणे ही बाब मौलिक अधिकाराच्या श्रेणीत बसत नाही आणि राज्य आपल्या हिशोबाने दारूच्या विक्रीवर नियंत्रण ठेवू शकतात, असे न्यायालयाने अनेक निकालांमध्ये म्हटले आहे. 1960 मध्ये गुजरातने बॉम्बे प्रतिबंधक कायदा, 1949 कायम ठेवला होता. त्या कायद्यातील तरतुदीच्या आधारे दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. याच कायद्यातील कलाम 12 आणि कलाम 13 मध्ये राज्यांना दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
तथापि, त्याव्यतिरिक्त औद्योगिक कार्यासाठी दारू विक्रीचा मुद्दा वेगळा ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थिती बंदी लागू असलेल्या राज्यांमध्ये औद्योगिक कार्यासाठी दारूची खरेदी केली जाऊ शकते. मात्र दारू पिण्यास मनाई आहे. आर्टिकल 19 (1) (जी) मध्ये म्हटले आहे कि, कोणतीही व्यक्ती आपल्या हिशोबाने कोणत्याही वस्तूंचा व्यापार करू शकते. परंतु यापासून काही वस्तूंना दूर ठेवण्यात आले आहे. आर्टिकल 47 च्या तरतुदीनुसार राज्ये दारूवर बंदी लादण्याचा निर्णय घेऊ शकतात.
ग्लँडस्टोनच्या मते, मद्यपानामुळे मानवजातीची जितकी हानी झाली तितकी युद्ध ,रोगराई, दुष्काळामुळेही झाली नाही.
ग्रामगितेच्या ६ अध्यायात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दारुचे वास्तव्य मांडलेले आहे.
काय पुसता गावाची व्यथा । आता तुम्ही।।७९।।
कोणी दंधारी, तमाशे करी। कुणी दारू पिऊन शिव्या उच्चारी।
कोणी कोणा न माने तिळभरी। लहान, थोर स्वैर झाले।।८०।।
व्यभिचाऱ्यांची झाली दाटी। गंजिफा खेळती पैशासाठी।
मुले करीती चोरी- चपाटी। काढती भट्टी घरोघरी।।८१।।
मांस खाण्याचे वाढले व्यसन ।चैन न पडे मद्यावाचून।
सिगारेट ओढूनि धूर सोडिती। धाकचि नाही कोणाचा।।८३।।
मजूर कष्टाने पैसे मिळवती। तोहि दारूपायी उधळती।
मुलाबाळां उपवास पडती। होय दुर्गती जीवनाची।।८४।।
दारू पिऊनि मारिती स्रीला। सगळ्या गावी चळ सुटला।
पूर आला भांडा भांडीला। कोर्ट कचेऱ्या गजबजल्या।।८५।।
लोळे गटारात अमीरही। कोणीही कोणास मारून देई।
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍️
सॉफ्टवेअर इंजिनिअर
राहुरी, अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत