राहुरी(वेबटीम) धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अँड.सिंड्रेला टोनी परेरा यांची तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी सागर विश्वनाथ...
राहुरी(वेबटीम)
धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अँड.सिंड्रेला टोनी परेरा यांची तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी सागर विश्वनाथ सावंत यांची निवड करण्यात आली आहे. धरणग्रस्त सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अब्बासभाई शेख यांनी ही निवड करून निवडीचे पत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे.
धरणग्रस्त सेवा संघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून अँड.सिंड्रेला टोनी परेरा काम करत असताना त्यांनी आपले कार्य महिला आघाडीपुरते मर्यादित न ठेवता भूमिहीन, कष्टकरी शेतकरी, प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यासाठी महाराष्ट्रभर काम केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन अब्बास शेख यांनी महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली.
तसेच नेवासा तालुकाध्यक्ष सागर सावंत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नगर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.तसेच नेवासा तालुका सदस्यपदी प्रकाश किसन सावंत यांची निवड करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत