राहुरी(वेबटीम) सोशल मीडियाचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी अशक्य कामे सुद्धा तुम्ही सहज पार पाडू...
राहुरी(वेबटीम)
सोशल मीडियाचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी अशक्य कामे सुद्धा तुम्ही सहज पार पाडू शकतात.
सन 2019 रोजी राहुरी फॅक्टरी येथील तरुणांनी एका अपघातात मेंदूला दुखापत झालेल्या आपल्या मित्राला वैद्यकीय खर्चासाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा यासाठी एक व्हाट्स अप ग्रुप तयार केला होता.
Please Help.. हे नाव या व्हाट्स अप ग्रुप ला देऊन या तरुणांनी आपले राहुरी,राहुरी फॅक्टरी, नगर जिल्ह्यातील मित्र परिवार,पुणे जिल्ह्यातील मित्र परिवार इतकेच नाही नोकरीच्या निमित्ताने परदेशात असलेल्या मित्रांच्या मदतीने लाखोंचा निधी अवघ्या काही दिवसात जमवून या मित्राला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले होते.
अशा प्रकारे या ग्रुप च्या माध्यमातून मदतीचे आव्हान केल्यानंतर आपल्या कमाईतील काही रक्कम अशा गरजवंत रुग्णांना जमा करून, केवळ माणुसकी हाच एक धर्म हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या तरुणांनी आतापर्यंत एक नाही,दोन नाही तर तब्बल आठ वेळा ५० हजार ते ५ लाखपर्यंतची आर्थिक मदत वैद्यकीय कामासाठी केलेली आहे.
दि 28 ऑगस्ट 2022 रोजी राहुरी फॅक्टरी,प्रसादनगर येथील रहिवाशी श्री किरण सुदाम निकाळजे यांचा मुलगा चि साई किरण निकाळजे या 13 वर्षाच्या शाळकरी मुलाला दीड वर्षांपूर्वी T-CELL Lymphoma Synovitis या प्रकारचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले.
निकाळजे कुटुंबाची अगदी जेमतेम परिस्थिती असल्या मुळे कसेबसे त्यांनी त्यांच्या मुलाला या आजारातून बाहेर काढले होते.
परंतु दोन महिन्यांपासून त्यांच्या मुलाला HIP Arthotony+I.V. Antibiotics हा खुब्याचा आजाराने चालता येत नव्हते
औरंगाबाद येथील डॉ वीरांची वैद्य हॉस्पिटलमध्ये या मुलावर तपासणी व पुढील उपचार हे केले जाणार होते.
परंतु हॉस्पिटल ने याचा सर्व खर्च 70000 रु सांगितल्या नंतर निकाळजे कुटुंब चिंताग्रस्त झाले होते.
निकाळजे कुटुंबाने Please Help च्या सदस्यांना आपली सर्व हकीकत सांगितल्यानंतर या टीमचे सदस्य त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले व सर्व मेडिकल रिपोर्ट बघितल्यानंतर आपल्या व्हाट्स अप ग्रुप च्या माध्यमातून आपल्या सर्व मित्र परिवारास वैद्यकीय आर्थिक मदतीचे आवाहन केले गेले.
या आवाहनास नेहमीप्रमाणे राहुरी फॅक्टरी,नगर,पुणे,मराठा बहुउद्देशीय संस्था राहुरी तसेच ALTURA FACTORY, WLL, DOHA,QATAR येथील सर्व सहकाऱ्यांनी केवळ दीड दिवसात 80000 रुपये किरण निकाळजे यांच्या बँक खात्यात जमा करून दिले.
धावपळीच्या या जगात कुणीच कुणाकडे लक्ष देत नसताना केवळ व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून समाजातील दानशूर व सामाजिक कार्याची आवड असलेल्या लोकांना एकत्रित करून अशी वैद्यकीय मदत करणाऱ्या या Please Help या ग्रुप च्या सर्व सदस्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
समाजातील दानशूर मंडळी प्लिज हेल्प या ग्रूपवर वैद्यकीय मदतीसाठी केलेल्या आवाहनावर विश्वास ठेवून किंबहुना तातडीने प्रतिसाद देऊन मदत करत असल्याने हे शक्य होत असल्याचे ग्रुप ऍडमिन तथा सामाजिक कार्यकर्ते वसंत कदम यांनी सांगितले.
*३० हजार रुपये मदत*
नारायण गाव येथील रहिवासी सध्या कतार या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास असनारे रमेश पवार साहेब यांनी पुढाकार घेऊन त्यांची कंपनी All Staff,ALTURA FACTORY, WLLमधील सर्व सहकारी मित्र परिवाराच्या वतीने 30000 रु साई निकाळजे या मुलाच्या शस्त्रक्रियासाठी केली आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक वेळी रमेश पवार साहेबांचे योगदान हे वैद्यकीय मदतीसाठी असते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत