देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा पोलिस दुरक्षेञावर घेण्यात आलेली सार्वजनिक गणेशत्सव शांतता कमिटीची बैठक केवळ फार्स म्हणून घेण्यात आली ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा पोलिस दुरक्षेञावर घेण्यात आलेली सार्वजनिक गणेशत्सव शांतता कमिटीची बैठक केवळ फार्स म्हणून घेण्यात आली की काय असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.पन्नास हजार लोकसंख्येच्या गावात अवघे बारा जण शांतता बैठकीला उपस्थित होते.देवळाली प्रवरा शहरातील मोठे मंडळ, राजकीय व्यक्ती, प्रमुख कार्यकर्ते, व्यापारी मंडळ यांना शांतता बैठकी पासुन दुरच ठेवले आहे.अनेक सार्वजनिक गणेशत्सव मंडळांना शांतता बैठकीची कल्पनाही नाही. त्या पोलिस अधिकाऱ्यांच्या सुचने नुसार जादा गर्दी करु नका असे फर्मान असल्यानेच दुरक्षेञातील पोलिसांनी बैठकीचे निमंञन दिले नाही का ? असा प्रश्न राजकीय नेत्यांसह प्रमुख संघटनांचे पदाधिकारी करीत आहे.
देवळाली प्रवरा दुरक्षेञावर सार्वजनिक गणेशत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. ठराविक दहा ते बारा मंडळांच्या कार्यकर्त्यांना शांतता कमिटीच्या बैठकीचे आमंञण देण्यात आले होते.या बैठकीला शहरातील राजकीय, सामाजिक संघटना, राजकीय प्रमुख पदाधिकारी, व्यापारी संघटना या बोलविण्यात आले नसल्याने शांतता बैठक केवळ फार्स म्हणून घेण्यात आली का? असा प्रश्न येथिल प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
देवळाली प्रवरा दुरक्षेञावर बैठक घेण्यासाठी राहुरीचे पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शांतता बैठक हि कामात काम म्हणून उरकण्यात आली.देवळाली प्रवरा येथिल दरोड्याच्या गुन्ह्यातील अविनाश इरले या अटक असलेल्या आरोपीस तपासासाठी देवळाली प्रवरात आणण्यात आले.त्याच वेळी हि बैठक घेण्यात आली. आरोपीला माञ खाजगी एअर कंडिशनर गाडीतून फिरविण्यात आले.
गणेशत्सव म्हटले की नगर पालिकेचा ना हरकत दाखला आवश्यक असतोच तसेच नगर पालिकेच्या वतीने पर्यावरण पुरक गणेशत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न असतात तरीही या शांतता बैठकीचे मुख्याधिकारी अजित निकत यांना व त्याच्या अधिकाऱ्यांना निमंञण देण्यात आले नव्हते.महावितरणाचा एकाही अधिकाऱ्यांला निमंञण नसल्याचे महावितरण कार्यालयातुन सांगितले जात आहे. येथिल माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,उद्योजक गणेश भांड, माजी उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, प्रकाश संसारे, सचिन ढुस, माजी नगरसेवक डाँ.विश्वास पाटील,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, शिवसेना शहर अध्यक्ष सुनिल कराळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतिष वाळूंज, सचिन कोठुळे, दासू पठारे, गणेश पठारे, मोहसीन शेख,सुधीर टिक्कल,संदिप कदम, मुस्लिम पंच कमिटी,कामगार तलाठी, नगरसेवक, साईनाथ बर्डे, कुमार भिंगारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासह अनेक गणेश मंडळांना शांतता बैठकीचे निमंञण हि देण्यात आले नव्हते.शांतता बैठक घेऊन केवळ फार्स निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अशी प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत