वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान नवरात्र उत्सव २०२...

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान नवरात्र उत्सव २०२२-२३ च्या अध्यक्षपदी अमोल कदम यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर दौंड यांची नुकतीच पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मागील दोन वर्षांच्या काळात कोरोना महामारीमुळे नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा केला गेला. यंदा  २०२२  रोजी नवरात्रोत्सव विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून कलागुणांना वाव देऊन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या पार पडलेल्या बैठकीत मावळते अध्यक्ष संतोष कराळे व उपाध्यक्ष मयूर मोरे यांचा सन्मान वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांनी केला.

प्रसंगी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान नवरात्र उत्सव २०२२-२३ कार्यकारणी जाहीर करण्यात आला यामध्ये कार्याध्यक्षपदी मयूर मोरे,व्यवस्थापकपदी अरुणसाहेब पठारे,सल्लागारपदी मनोज गावडे,सचिवपदी मनोज तांबे,सहसचिवपदी नितिन मोरे,खजिनदारपदी सुयोग सिनारे,सह खजिनदारपदी मनोज कदम,संपर्क प्रमुखपदी सुनील जाधव,संघटकपदी अविनाश वरखडे,सह संघटकपदी प्रमोद कवाने,प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार ऋषि राऊत,सहप्रसिद्धी प्रमुखपदी राकेश बोरसे यांची निवड करण्यात आली आहे.

यानिवडीचे वैष्णवी चौकाचे मार्गदर्शक  सुरेश आप्पा दौंड,वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वसंत कदम, मावळते अध्यक्ष संतोष कराळे सर्व सदस्यांनी स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत