राहुरी(वेबटीम) राहुरी न्यायालयात वाहतुकीचे नियम या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुर...
राहुरी(वेबटीम)
राहुरी न्यायालयात वाहतुकीचे नियम या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर होत्या. यावेळी सह.न्यायाधीश सौ.रुपाली तापडिया मॅडम,सह. न्यायाधीश सौ. पूनम बिडकर मॅडम,राहुरी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.राहुल शेटे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
वाहतूकीच नियम या विषयावर सह. न्यायाधीश सौ.रुपाली तापडिया मॅडम म्हणाल्या की, जीवन अनमोल आहे वहातुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा.
ॲड.प्रकाश संसारे म्हणाले की, वाहन चालवताना ड्रायव्हरने साईड बेल्ट लावणे गरजेचे आहे.
पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके यांनी वाहतुकीच्या नियमांचे सखोल असे मार्गदर्शन केले .
मुख्य न्यायाधीश आसावरी वाडकर आपल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की,विधी सेवा समिती च्या सर्वच कार्यक्रमास सर्व वकिलांनी या अगोदर ही सहकार्य केलेले आहे या पुढे देखील असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन करून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपण आपल्या जीवनाची व दुसऱ्याच्या जीवनाची सुरक्षा करावी.तसेच १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेऊन सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुरी तालुका बार असोसिएशनचे मा.उपाध्यक्ष तथा तालुका विधी सेवा समितीचे पॅनल लॉयर्स ॲड.मच्छिंद्र देशमुख यांनी केले
या कार्यक्रमास उपाध्यक्ष कारभारी ढोकणे,सेक्रेटरी ज्ञानेश्वर येवले, सह.सेक्रेटरी ॲड. चंद्रशेखर शेळके,ॲड .संजय वने,ॲड.बबन आघाव,ॲड.गणेश तोडमल,ॲड.अनिल वाळके, ॲड मोहनिश शेळके, ॲड.मनीषा आढाव, ॲड.ज्योती राऊत ॲड. कल्याणी पागिरे, ॲड अनिता तोडमल, ॲड.मनीषा पंडित, ॲड.प्रसाद कोळसे, ॲड. अजय पगारे,ॲड.गोरख रसाळ,ॲड. चांगदेव शेटे,ॲड. संतोष साळुंके,ॲड. सिताराम साळुंखे,ॲड.सुहास तोडमल,ॲड. कचारू चीतळकर,ॲड.कचेश्वर घाडगे,ॲड.महेश पेरणे,ॲड,निलेश धुमाळ,ॲड.सविता गांधले,ॲड.जयश्री घावटे,ॲड.सुनीता लहाने,ॲड.अर्चना मैड,ॲड.भाऊसाहेब पवार,लीगल विभागाचे विकास जाधव व लाभार्थी पक्षकार बंधू भगिनी होते.
आभार राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.राहुल शेटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत