अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर छापा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर छापा

 नेवासा( प्रतिनिधी)  Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर ते औरंगाबाद जाणारे रोड वर वडाळा  बहिरोबा शिवारातील ह...

 नेवासा( प्रतिनिधी) 



Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर ते औरंगाबाद जाणारे रोड वर वडाळा  बहिरोबा शिवारातील हॉटेल साई सबुरीचे पाठीमागे काही इसम हे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहेत त्यानुसार त्यांनी लगेच आपले पथकातील अधिकारी, अंमलदार आणि नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या समवेत पुरवठा विभागातील कर्मचारी यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा व किमतीचा अवैध मुद्देमाल मिळून आला.

 -1) 5,00,000 रू कि चा .   एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक MH 16 CC 2488 जु.वा कि.अं.

2) 2,08,000 रू.कि च्या भारत गँसच्या  अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल मोकळ्या 87 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या जु.वा .कि.अं

3) 12,000रू कि.च्या नोझलला लावलेल्या इंडियन गँसच्या  कमर्शिअल मोकळ्या 5 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या जु.वा .कि.अं.

4) 2500 रू कि.चा एक HP कंपनीची घरघुती गँस सिलेन्डर 14.5किलो क्षमतेचा अंदाजे 5किलो गँस असलेला जु वा कि.अं.

5) 1,32,000रू किमतीचे टेम्पोमध्ये  भरलेल्या भारत गँसच्या  अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल भरलेले 30 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे  जु.वा .कि.अं

6)22,000 रू.कि चे टेम्पोमध्ये  भरलेले इंडियन गँसचे अर्धवट निळ्या रंगाचे कमर्शिअल 05गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे  जु.वा .कि.अं

7)1200रू कि.चे निळ्या रंगाचा अंदाजे 5 फुट लांबीचा प्लास्टीक पाईप त्याला पांढ-या रंगाचे 06 नळ्या जोडलेल्या असुन प्रत्येक नळीला समोरील तोंडास नोझल जोडलेले जु.वा कि.अं.

8)1000 रू कि.चे एक 2इंच व्यासाचा लोखंडी पाईप त्याला काळ्या रंगाचे अंदाजे अर्धा इंचाचे व 5फुट लांबीचे काळ्या रंगाचे प्लास्टीकचे पाईप जोडलेले असुन त्यांना प्रत्येक पाईपला एक असे  05 नोझल जु.वा कि.अं.

9)2500रू कि.चे काळ्या रंगाचा अंदाजे दिड इंच व्यासाचा अंदाजे 25ते 30 फुट लांबीचा  रबरी पाईप जोडलेला असुन त्याच्या पुढील बाजुस लोखंडी साँकेट जोडलेले असा एकूण सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानुसार आरोपी विरुद्ध पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांचे फिर्यादीनुसार शनिशिंगणापूर गु.र.नं -97/2022भादवी कलम 379,285,34 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3,7 सह LPG पुरवठा वितरन आणि नियमन आदेश 2000 चे कलम 3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली Dysp  संदीप मिटके , नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पुरवठा अधिकारी रुपाली मोडसे, Api  रामचंद्र करपे,Asi  राजेंद्र आरोळे,Hc ज्ञानेश्वर माळवे, रमेश लबडे, संतोष वाघ,Pc नितीन शिरसाठ आदींनी केली.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत