राहुरी : वेबटीम राहुरीमध्ये काल मांजराची नसबंदी शस्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पा...
राहुरी : वेबटीम
राहुरीमध्ये काल मांजराची नसबंदी शस्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.
राहुरी येथील दंतरोग तज्ञ डॉ कौस्तुभ भागवत ह्यांच्या मांजरावर ही शस्त्रक्रिया झाली.येथील पशु वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ शितलकुमार नवले,डॉ विठ्ठल निमसे ह्यांनी परिश्रम घेऊन ही शस्त्रक्रिया पार पाडली.
मांजर हा प्राणी दर 4 महिन्याला पिल्ले देतो.अनेक लोक पिल्ले झाल्यावर रस्त्यावर सोडून देतात.अनेक मांजराचे पिल्ले रस्त्यावर हाल होऊन मरण पावतात। हे सर्व होऊ नये म्हणून मांजराची नसबंदी शस्त्र क्रिया गरजेची आहे,राहुरी येथील प्राणिप्रेमी ,पेटा ग्रुप चे सदस्य दंतरोग तज्ञ डॉ कौस्तुभ भागवत ह्यांनी ही शस्रक्रिया पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.
लोकांनी आपल्या पाळीव मांजराची लवकरात लवकर नसबंदी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी ह्यावेळी केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत