राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे सकल नाभिक समाजाच्या वतीने संतश्रेष्ठ संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रस...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे सकल नाभिक समाजाच्या वतीने संतश्रेष्ठ संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी श्रावणी सोमवार निमित्ताने खिचडीचे वाटप नाभिक बांधवांच्या वतीने करण्यात आले.
दरम्यान दैनंदिन शिवपुजन अर्थात राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यास दैनंदिन हार घालून पुजा करण्याचा उपक्रम चालू करणारे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा कार्यगौरव पुरस्कार प्राप्त नाभिक संघटनेचे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतजी विश्वासराव यांचाही सन्मान नाभिक बांधवांच्या वतीने करण्यात आला.
प्रसंगी मेजर अण्णा कोरडे,आप्पासाहेब थोरात, शुभम वाघमारे,प्रसाद वाघमारे,किरण थोरात,अनिल वाघमारे,बाळासाहेब बिडवे,ऋषिकेश हुडे,तुषार राऊत,संदिप वाकचौरे,स्वप्नील बोरूडे व पंचक्रोशीतील आदी समाज बांधव उपस्थित होते..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत