राहुरी(वेबटीम) राहुरी येथील एमआयडीसी परिसरातील गायीची तब्बल १ लाख ५० हजाराला विक्री झाली. विक्रमी किंमतीला गाय विकली गेल्याने गायीच्या मा...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील एमआयडीसी परिसरातील गायीची तब्बल १ लाख ५० हजाराला विक्री झाली. विक्रमी किंमतीला गाय विकली गेल्याने गायीच्या मालकाने व मित्र परिवाराने फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला.
राहुरी एमआयडीसी येथील अमिनभाई पठाण यांच्या मालकीची गाय बुधवारी लोणी येथील बाजारात विक्रीसाठी नेली. या बाजारात गायीची 1 लाख ५० हजाराला विक्री झाली. बारामती येथील हुसेन भाई यांनी या गायीची खरेदी केली.
राहुरी एमआयडीसी येथील अमिनभाई यांनी गायीच्या विक्रीनंतर या गायीची गुलालाची उधळण करीत व फटाके फोडून तिची पाठवणी केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत