राहुरी(वेबटीम) कांदाला प्रतिकीलो २५ ते ३० रुपये किलो भाव मिळावा या हेतूने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत १६ ऑगस्...
राहुरी(वेबटीम)
कांदाला प्रतिकीलो २५ ते ३० रुपये किलो भाव मिळावा या हेतूने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत १६ ऑगस्ट पासून बेमुदत बंद पुकारला असून या आंदोलनात कांदा उत्पादकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेचे राहुरी तालुका युवा अध्यक्ष प्रमोद गोवर्धन मुसमाडे यांनी केले आहे.
याबाबत बोलताना प्रमोद मुसमाडे म्हणाले की, शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीत मातीमोल विक्री होत असताना यावर्षी नाफेडकडून अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला. परंतु नाफेडने ही शेतकऱ्यांचा कांदा १० ते १२ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ठिकाणावर कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलोला २० ते २२ रुपये येत असताना शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून कांद्याला सरासरी ८ ते १० रुपये इतका कमी दर मिळत आहे. प्रतिकिलो २५ रुपये भाव न मिळाल्यास १६ ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा विक्री बेमुदत बंद आंदोलन होणार असून या आंदोलनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेचे राहुरी तालुका युवा अध्यक्ष प्रमोद गोवर्धन मुसमाडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत