संगमनेरचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांचा जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पद्मश्री पवार यांच्या हस्ते गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संगमनेरचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांचा जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पद्मश्री पवार यांच्या हस्ते गौरव

  संगमनेर(वेबटीम)  महसूल दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्...

 संगमनेर(वेबटीम)



 महसूल दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पद्मश्री पोपटराव पवार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. राहुरीचे तत्कालीन व सध्या संगमनेर येथे कार्यरत असलेले नायब तहसीलदार गणेश तळेकर यांचा उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून गौरव करण्यात आला.


१ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, विठ्ठल बुलबुले, निवृत्त कर्नल आर व्ही धुमाळ आदी उपस्थित होते. जिल्ह्यात संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत रामदास मंगरुळे यांची उपजिल्हाधिकारी संवर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. संगमनेर नायब तहसीलदार गणेश तळेकर,बकर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे,  जिल्हाधिकारी कार्यालयातील लघुलेखक श्रीमती पल्लवी खेडकर, अव्वल कारकून रामकिशन नलवडे (जिल्हाधिकारी कार्यालय), श्रीमती किशोरी त्र्यंबके (कर्जत तहसील), मंडळाधिकारी सचिन पोटे (पारनेर तहसील), महसूल सहायक श्रीमती वैशाली धायगुडे (जिल्हाधिकारी कार्यालय), कैलास खाडे (अकोले तहसील), तलाठी ऋषिकेश खताळ (श्रीगोंदा तहसील),श्रीराम कुलकर्णी,(जामखेड तहसील), सतीष गायके (कोपरगाव तहसील), वाहनचालक म्हातारदेव मोरे, (श्रीरामपूर उपविभागीय कार्यालय) शिपाई दिपक दिनकर (पाथर्डी तहसील), कोतवाल महेश देशमुख(राहुरी)विकास वर्पे, तुळशीराम शिंदे, पोलीस पाटील कृष्णा अभंग, बाळासाहेब घुले, अंबादास देवकर यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत