राहुरी(वेबटीम) राहुरी तहसील कार्यालयातील कोतवाल महेश देशमुख यांना आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते 'उत्कृष्ट कर्मचारी...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तहसील कार्यालयातील कोतवाल महेश देशमुख यांना आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते 'उत्कृष्ट कर्मचारी' पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते. महेश देशमुख यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी डॉ.अनिल पवार,तहसीलदार एफ.आर.शेख व महसूलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
आज मिळालेला "सन्मान" आयुष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी सतत "ऊर्जा" देत राहील असे महेश देशमुख यांनी 'आवाज जनतेचा' वेबपोर्टला प्रतिक्रिया देताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत