श्रीरामपूर (प्रतिनिधी) योगानोगाने राज्याला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस असे अनुभवी आणि धाडसी नेतृत्व ल...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
योगानोगाने राज्याला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस असे अनुभवी आणि धाडसी नेतृत्व लाभले आहे. गेले पंचेचाळीस वर्षाचा जिल्हा विभाजन प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. सरकारने सामाजिक प्रश्न समजुन सर्वात कमी खर्च येणारा श्रीरामपूर जिल्हा तात्काळ जाहिर करावा अशी मागणी सरकारकडे ई-मेलद्वारे श्रीरामपूर जिल्हा सामाजिक विकास प्रतिष्ठाण आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका संघर्ष कृती समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.
निवेदनात राजेंद्र लांडगे म्हणाले कि, भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्हा सर्वात मोठा आहे. आणि नगर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास पन्नास लाख झाली आहे. या मोठ्या वास्तव तफावतेने नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. करोना संकटात प्रशासनासह संपूर्ण जनतेला याचा अनुभव आला आहे.
छोटे जिल्हे आणि नवीन तालुके निर्माण झाल्यास केंद्र आणि राज्याच्या अनेक कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेसाठी प्रशासनाला सहजतेने राबविता येतील.अनेक नवीन नवीन उद्योग धंदेसह महसुली उत्पन्न देखील वाढतील. यामुळे सर्व सामान्यांची क्रयशक्ती निश्चितच वाढेल.
एकंदरीत शिंदे-ठाकरे सरकार जिल्हा विभाजनास पहिल्या पासूनच सकारात्मक दिसत आहे.शिंदे ठाकरे सरकारला निकषाचे आधारे आणि सर्वात कमी खर्च येणारा श्रीरामपूर जिल्हा जाहीर करण्याचा सुवर्णयोग आला आहे. या निमित्ताने सर्वांनाच अच्छे दिन अनुभवयास मिळतील असेही राजेंद्र लांडगे यांनी सामाजिक भावनेतून आमचे प्रतिनिधीशी बोलतांना भावना व्यक्त केल्या आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत