प्रेरणा मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक पदी धानोरे येथील प्रा.नंदकुमार दिघे यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रेरणा मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक पदी धानोरे येथील प्रा.नंदकुमार दिघे यांची निवड

  देवळाली प्रवरा(वेबटीम) अहमदनगर जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या प्रेरणा मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक पदी धा...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



अहमदनगर जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या प्रेरणा मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक पदी धानोरे येथील प्राध्यापक नंदकुमार दिघे यांची निवड करण्यात आली 

प्रा.दिघे यांना नेहमीच सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा चांगला अनुभव आहे.तांभेरे येथील संत महिपती विद्यालयात ते कार्यरत आहेत.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालया मार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. दिल्ली उदयपूर सिक्कीम गुवाहाटी आधी ठिकाणी सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल विचार व्यक्त केले आहेत.


प्राध्यापक दिघे यांच्या निवडीने शिक्षक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे आज संस्थेच्या कार्यालयात प्राध्यापक दिघे यांचा सत्कार करण्यात आला.


 यावेळी बोलताना प्राध्यापक दिघे म्हणाले, आर्थिक संस्था सांभाळताना अत्यंत सावध भूमिका घ्यावी लागते प्रसंगी लांबचा जवळचा न करता कठोर भूमिकेला देखील तोंड द्यावे लागते त्यामुळे सभासदांचा विश्वास वाढत असतो.प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी प्रचंड मेहनतीने हा वटवृक्ष उभा केला आहे. त्यामागे त्यांचे कष्ट बोलण्यातील नम्रपणा व मृदू भाव आहे.  प्रेरणा मल्टीस्टेटचा जिल्ह्यात नावलौकिक आहे तो नावलौकिक वाढवण्यासाठी मी सतत प्रयत्न करीन असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.


यावेळी संस्थेच्या वतीने प्राध्यापक दिघे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्हा चेअरमन विष्णुपंत वर्पे,प्रेरणा पतसंस्थेचे  व्हा चेअरमन मच्छिंद्र हुरुळे, संचालक लांबे सर ,संचालक श्रीकांत जगधने ,संजय लांबे ,सुजित वाबळे, प्रेरणा पतसंस्थेचे संचालक राजेंद्र गांडुळे, गुहाचे सरपंच गंगाराम चंद्रे, नमजी उऱ्हे,पतसंस्थेचे जनरल मॅनेजर गोरक्ष  चंद्रे, संस्थेचे जनरल मॅनेजर अनिल वर्पे आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत