वैष्णवी चौक नवरात्रोत्सव निमित्त भव्यदिव्य मंडपाचे काम सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वैष्णवी चौक नवरात्रोत्सव निमित्त भव्यदिव्य मंडपाचे काम सुरू

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी परिसरातील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्ताने यंदाही विविध धार्मिक, सामाजिक...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी परिसरातील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्ताने यंदाही विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने भव्य- दिव्य मंडप उभारणीच्या कामास आज मंगळवारी प्रारंभ झाला आहे.

कोरोना संकटामुळे दोन वर्षे नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला मात्र प्रशासनाने यंदा निर्बंध हटविल्याने देवी भक्तमध्ये मोठा उत्साह आहे.

२६ सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत असून यानिमित्ताने वैष्णवी चौक येथील मंडप उभारणी कामास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी सुयोग सिनारे, महेंद्र दोंड, प्रसाद कदम, संतोष कदम, सचिन कदम, रामेश्वर तोडमल, प्रदीप भगत, धनंजय थोरात आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत