नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरण, राहुरीतून एकास घेतले ताब्यात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरण, राहुरीतून एकास घेतले ताब्यात

राहुरी(वेबटीम) मंत्रालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाच्या प्रकरणात राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली असताना सर्वत्र गाजल...

राहुरी(वेबटीम)



मंत्रालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाच्या प्रकरणात राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली असताना सर्वत्र गाजलेल्या सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सूरज पवार हा पोलिसांच्या रडारवर असताना राहुरी तालुक्यातील खंडांबे येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असताना एकच खळबळ उडाली आहे.



विजय बाळासाहेब साळे(वय-३७) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. नेवासा येथील महेश वाघडकर याने फिर्याद दिल्यानंतर मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळणारे तिघांना दत्तात्रय क्षीरसागर, आकाश शिंदे व ओंकार तरटे या तिघांना अटक केली होती. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्या पथकाने खंडांबे येथून विजय बाळासाहेब साळे यास ताब्यात घेतले आहे. या फसवणूक प्रकरणात आरोपींची संख्या वाढत असल्याने मोठं रॅकेट उघडकीस होणार असून अनेक नावे यात समोर येणार येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत