सात्रळ(वेबटीम) महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात प्रवरा परिसराचे भाग्यविधाते ना. राधाकृष्ण विखे पाटलांना महत्वाचे असे महसूल, पशुसंवर्...
सात्रळ(वेबटीम)
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात प्रवरा परिसराचे भाग्यविधाते ना. राधाकृष्ण विखे पाटलांना महत्वाचे असे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास हे शेतकरांशी निगडित असलेले खाते मिळाल्या निमित्त तसेच गणेश उत्सवानिमित्त परिसरातील नागरिकांना खव्याचे मोदक बॉक्स भेटीचे वाटप विखे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू पाटील यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी विश्वासराव कडू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे विश्वासाने ना. राधाकृष्ण विखे पाटीलांवर महत्वाचे खात्याची जवाबदारी सोपविल्याबद्दल तसेच राज्यातील महसूल विषयी तसेच शेतकरांशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी योग्य अश्या व्यक्ती ची निवड केल्याबद्दल परिसराच्या वतीने आभार मानले आहेत.
या भेटवाटपाच्या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते जे. पी. जोर्वेकर, रमेश शिंदे, रवींद्र दिघे, वसीम तांबोळी, सोमनाथ घोलप, आकाश दातीर, महेश दिघे, विजू निधाने, बाबासाहेब कडू, तसेच परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्तिथ होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत