गणेगाव-तांभेरे रोडवर अज्ञात माथेफिरू व्यक्तीने फिरविला नांगर! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगाव-तांभेरे रोडवर अज्ञात माथेफिरू व्यक्तीने फिरविला नांगर!

  राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील गणेगाव- तांभेरे रस्ता आधीच अतिशय खराब झालेला असताना या रोडवर माथेफिरू व्यक्तीने ट्रॅक्टर केणीच्या सहाय...

 राहुरी(वेबटीम):-


राहुरी तालुक्यातील गणेगाव- तांभेरे रस्ता आधीच अतिशय खराब झालेला असताना या रोडवर माथेफिरू व्यक्तीने ट्रॅक्टर केणीच्या सहायाने नांगरला असल्याने मोठी अडचण निर्माण झाली असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांतून समजते.प्रशासनाने सदरील बाबीची पाहणी करून संबधितावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतुन होत आहे.



गणेगाव- नालकर वस्ती- तांभेरे असा रस्ता असून या रस्त्यावर खडीकरण केलेले आहे. खडीकरण असल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी नेहमीच त्रास होतो. कसतरी  वाट काढत ये-जा सुरू असते.या रस्त्याचे काम कधी मार्गी लागेल असा प्रश्न निर्माण होत आहे.


या रस्त्यावर  कणगर परिसरात कोणीतरी  अज्ञात माथेफिरू व्यक्तीने  ट्रॅक्टर  केनी साह्याने संपूर्ण रस्ता नांगरला असल्याचे समजते.त्यामुळे आता सदर ठिकाणी माती मिश्रित रस्ता तयार झाला असून त्या रस्त्याने वाट काढणे अवघड बनले आहे. मोटरसायकल व पायी चालणे अवघड बनले आहे. सदर चिखलात गाड्या फसत आहे. रस्त्याने जाणे येणे मुश्किल झाले असून सदर व्यक्तीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत