महसूल मंत्री विखे पाटील आज राहुरीत! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महसूल मंत्री विखे पाटील आज राहुरीत!

राहुरी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज राहुरी तालुका भाजपा च्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमासाठी...

राहुरी (प्रतिनिधी):-


महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज राहुरी तालुका भाजपा च्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमासाठी राहुरी तालुक्यात येत आहेत,त्यांचे समवेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहळ्या निमित्त राज्याच्या राजकारणापेक्षा तालुक्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न असणाऱ्या नगर -मनमाड रस्ता व डॉ.तनपुरे कारखान्या बाबत विखे पिता पुत्र काय भाष्य करतात याकडे राहुरीकरांचे लक्ष लागले आहे.

      जागतिक दर्जाचे तिर्थ क्षेत्र असणारे शिर्डी व शनी शिंगणापूर यांना जोडणारा नगर मनमाड रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे रोज एक बळी जात आहे. वेळो वेळी डागडुजी करून वेळ मारून नेली जात आहे मात्र ठोस निर्णय होत नाही.खासदार विखे यांनी साडे चारशे कोटी मंजूर करून रस्त्याचे कामाची सुरवात झाली मात्र लोकप्रतिनिधी नी दिलेल्या त्रासामुळे ठेकेदार पळाला असल्याचे खासदार विखे म्हणाले होते, त्या लोकप्रतिनिधींचे नाव विखे जाहीर करणार का?रोज एक बळी जातोय हे कधी बंद होणार? मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना भरापाइ जाहीर करणार का? विविध सामाजिक संस्था,व्यक्ती,संघटना या रस्त्या बाबत आंदोलने करून,पत्रकार बातम्या देऊन थकले आहेत मात्र नगर मनमाड रस्त्याचा ठोस निर्णय होत नाही. या रस्त्याचे नादुरुस्तीचे नेमके रहस्य काय आहे? या बाबत विखे पिता पुत्र काय सांगतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. 

  डॉ.तनपुरे कारखाना हा तालुक्याची कामधेनू आहे.हा कारखाना सुरु करून सभासदनच्या उसाला रास्त भाव देणार का? कारखाना सुरु करून सभासद व कामगारांना दिलासा देणार का?  असे एक ना अनेक स्थानिक जिव्हाळ्याचे प्रश्न लोकांना पडले आहेत.

       राज्य व केंद्र सरकारच्या विविध गोष्टीवर भाष्य करण्या बरोबर या स्थानिक प्रश्नांचा उहापोह होण्याची अपेक्षा राहुरीकर करीत आहेत.


    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत