राहुरी/वेबटीम:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहुरी तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांनी आज रविवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थिती...
राहुरी/वेबटीम:-
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहुरी तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांनी आज रविवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
दरम्यान आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहुरी तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांनी ना.विखे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. आ.तनपुरे व राष्ट्रवादी गटाला या प्रवेशाने धक्का बसला आहे.
तसेच मोरया ग्रुपचे गोरख अडसूरे यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर खा.सुजय विखे पा., माजी आ.शिवाजीराव कर्डीले, माजी आ.चंद्रशेखर कदम, जेष्ठ नेते सुभाषराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजपचे जेष्ठ नेते आसाराम ढुस,डॉ.तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे,व्हा.चेअरमन दत्तात्रय ढुस,माजी चेअरमन उदयसिंह पाटील,तालुका दूध संघाचे तान्हाजीराव धसाळ,राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, जेष्ठ नेते उत्तमराव म्हसे,माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब तनपुरे,सुरेश निमसे, सूरसिंगराव पवार,विकास मंडळाचे, रावसाहेब चाचा तनपुरे,राजेंद्र उंडे, भैय्या शेळके,तसेच राहुरी कारखान्याचे सर्व संचालक,भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत