राहुरी फॅक्टरी येथील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवतेज सामाजिक,सांस्कृतिक व ग्रामीण विकास स...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवतेज सामाजिक,सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था  यांच्या वतीने कारखाना चाळ क्र.१८ येथे २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात येणार आहे.



मागील दोन वर्षांच्या काळात कोरोना महामारीच्या संकटामुळे छोटेखानी पध्दतीने झालेल्या नवरात्रोत्सव यंदा मात्र विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवतेज मंडळाचे संस्थापक सुरेश लोखंडे,बाळासाहेब लोखंडे,बाळासाहेब आढाव,गजानन घुगरकर,अजय खिलारी,संदीप महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व सदस्यांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध रूपरेषा आखली आहे.

या उत्सवात अनेक कलगुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विशेष आकर्षण म्हणजे सत्याग्रुप प्रस्तुत भव्य दांडिया- राहुरी,आकाश डान्स स्टुडिओ प्रस्तुत नृत्य जल्लोष ( अविष्कार नृत्यांचा )- अहमदनगर,होम मिनिस्टर (निवेदक-महाराष्ट्राचे लाडके भाऊजी राजेश मंचरे),अंताक्षरी व स्वामी स्वरांजली वाद्यवृंद     श्री.अजिंक्य गायकवाड प्रस्तूत ऑर्केष्ट्रा असे कार्यक्रम होणार आहेत.


तर संगीत खुर्ची,भजन संध्या,एक मिनिट,रांगोळी,नृत्य स्पर्धा, व प्रश्नमंजुषा याही कार्यक्रमांचे आयोन करण्यात आले आहे.


तसेच ऑर्केस्टा या कार्यक्रमात स्टार प्रवाह- मी होणार सुपरस्टार - छोटे गायक सहभागी बालकलाकार चि. जयेश खरे याचा सन्मान व गीतगायनाचा कार्यक्रम देखील होणार आहे.

तसेच स्थानिक कलावंतांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे,आणि भविष्यात उत्कृष्ट कलाकार तयार व्हावेत म्हणून खास संधी देखील उपलब्ध करून दिल्या आहेत.

तर नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण व दांडिया यांनी कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

तरी नवरात्रोत्सव काळात स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे  असे आवाहन नियोजन व व्यवस्थापन समितीचे अमित देशमुख व गोविंद खवडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत