देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कनिष्ठ विद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थीनीची छेडछाड करून विनयभंग केल्याप्रकर...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कनिष्ठ विद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थीनीची छेडछाड करून विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात देवळाली प्रवरा गावातील तिघांविरुद्ध पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी छेडछाड बाबत काही तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन गेल्या दोन दिवसापूर्वी केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद पीडित अल्पवयीन तरुणीने जराही न घाबरता राहुरी पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली असता तातडीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,देवळाली प्रवरा येथील १७ वर्षीय कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थीनी आज सकाळी आपला क्लास आटोपून सायकलवरून घराकडे जात असताना रस्त्यातच तिघांनी तिला गाठून वेगळेवेगळे हातवारे केले. त्यातील एकाने हात पकडून तू मला फार आवडते, माझ्या सोबत चल असे म्हणत तिच्या अंगावरील जर्किंग ओढून तिला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड करत त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. यावेळी मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती.
गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक दराडे यांनी रोडरोमिओ बाबतीत काही तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी किंवा मला स्वतः संपर्क करावा असे आवाहन केले होते. त्यानुसार सदर पीडित विद्यार्थीनि व तिच्या पालकांनी जराही न घाबरता राहुरी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगून रितसर फिर्याद दिली. या फिर्यादीवरून राहुल उर्फ काळ्या (पूर्ण नाव माहिती नाही),अविनाश नवनाथ धोत्रे, रोंग्या उर्फ बाबासाहेब पवार(पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत