छेडछाड कराल तर जेलची हवा खाल... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

छेडछाड कराल तर जेलची हवा खाल...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील  ज्या विद्यार्थिनींना रस्त्यावरून चालताना रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यांनी जराही ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील ज्या विद्यार्थिनींना रस्त्यावरून चालताना रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यांनी जराही न घाबरता राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.

सध्या रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. महाविद्यालय परिसरात व इतर ठिकाणी रोडरोमिओ रस्त्यावर उभे असतात. सकाळी व सायंकाळी महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस हे रोडरोमिओ टोळक्याने उभे असतात व मुलींना बघून हातवारे करतात. त्यामुळे मुलींना रस्त्यावरून चालताना रोडरोमिओंचा त्रास होतो. महाविद्यालय सुटल्यानंतर रोडरोमिओ आपली मोटारसायकल घेऊन मुलींच्यासमोर उभे राहतात. तसेच त्यांच्या मागे सुसाट वेगाने मोटारसायकल घेऊन त्यांची छेड काढतात  मात्र विद्यार्थिनी असे प्रकार घरी सांगत नाही.

याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक दराडे म्हणाले की, रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी राहुरी पोलिस सज्ज असून कोणाची तक्रार असेल तर पोलिस ठाण्याशी नंबरवर किंवा मला वयक्तिक कॉल  करावा किंवा व्हाट्स अपवर तक्रार करावी. याबाबत तक्रारदाराची माहिती गुपित ठेवली जाईल.

 दराडे म्हणाले की, रोडरोमिओंना घाबरून मुली शाळेत व महाविद्यालयात जाण्यास घाबरत आहेत. पालकही घाबरून आपल्या पाल्यांंना शाळेत व महाविद्यालयात पाठवित नाहीत. याबाबत विद्यार्थीनी व पालकांनी घाबरून न जाता राहुरी पोलिसांशी संपर्क करा. भविष्यात एकही मुलगी शाळा सोडणार नाही किंवा कोणतीही मुलगी भयभीत राहून जगणार नाही ही काळजी घेतली जाईल.यासाठी राहुरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल त्यासाठी तक्रार देण्यासाठी पूढे यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दराडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत