स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासवी- अरविंद जगताप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासवी- अरविंद जगताप

 सात्रळ(वेबटीम) आजच्या धगधगत्या काळात विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञाप्रमाणे संशोधक वृत्ती जोपासून काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स...

 सात्रळ(वेबटीम)



आजच्या धगधगत्या काळात विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञाप्रमाणे संशोधक वृत्ती जोपासून काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व शास्त्रज्ञ हे शांत बसून विचार करत नवीन तंत्रज्ञानातील गोष्टींचा शोध लावत होते. म्हणूनच त्यांनी इतिहास घडवला.कारण शास्त्रज्ञ ध्येयवेडे होते. तशाच पद्धतीने आजच्या पिढीने ही स्वतःला ध्येयवेडे बनून, स्वत:ला सिध्द करत,स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे.असे प्रतिपादन कर्मवीर जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले साहित्यिक, पटकथाकार, दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी केले.





          सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.


     याप्रसंगी रयत शैक्षणिक संकुलात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अरविंद जगताप, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब चासकर तसेच आदि मान्यवरांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब चासकर होते.

       भाऊसाहेब चासकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत म्हणाले. खरंच आपण किती भाग्यवान आहोत. आज रयतच्या अंगा-खांद्यावर खेळत आनंदाने शिक्षण घेत आहोत. त्यामुळे बाळांनो अनुभवतो शिकवण घेत पुढे चला, उघडून हे जग अनुभवा आणि आपण स्पर्धकांशीच स्पर्धा करा असा मोलाचा संदेश चासकारांनी विद्यार्थ्यांना दिला.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तसेच पाहुण्यांचा परिचय युवा नेते पंकज कडू यांनी केले.

         या समारंभानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आणि रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत दिले जाणाऱ्या पुरस्कार प्राप्त मुले विभागाचे उपशिक्षक विलास गभाले यांना उपक्रम शिक्षक तर विद्यार्थी प्रिय कन्या विभागाचे शिक्षक मंगेश कडलक यांना कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्कार मिळाल्याने या दोन्ही गुणवान शिक्षकांचे सत्कारही  प्रमुख पाहुणे अरविंद जगताप आणि भाऊसाहेब चासकर शुभहस्ते करण्यात आले.

      याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, अॅड विजयराव कडू पाटील,दिनकरराव कडू, बबनराव कडू पाटील, बाळासाहेब विखे, भास्करराव फणसे, किशोर शेठ भांड युवा नेते किरण कडू पाटील,चंद्रकांत डुक्रे, हिरानंदनी, नरेंद्र पाटील कडू, विक्रांत कडू,  अनिल शेठ लोढा, योगेश चोरमुंगे, योगेश कडू, सागर  डुक्रे, बाळासाहेब  असावा, उदयनराजे  कडू, अजीम तांबोळी,पत्रकार समर्थ वाकचौरे, सुनील सात्रळकर,संभाजी कडू, अनिल वाकचौरे, अमोल अंत्रे, बाबासाहेब वाकचौरे, सौ.हारदे, संकुलाचे प्राचार्य के.एम. ससाणे, मुख्याध्यापिका अनिता निबे भाऊसाहेब पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिराज मन्सूरी व मंगेश कडलग यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका निबे मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत