सात्रळ(वेबटीम) येथील पंचक्रोशीतील घटक असलेले पाथरे बु, येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त तसेच राज्याचे महसूल, दुग्धवि...
सात्रळ(वेबटीम)
येथील पंचक्रोशीतील घटक असलेले पाथरे बु, येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त तसेच राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने परिसरातील वृद्ध, निराधार घटकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजने चे लाभार्थी होण्यासाठी चे नोंदणी शिबीर पाथरे बुद्रुक येथील तलाठी कार्यालयात पार पडले.
या वेळी परिसरातील अनेक पात्र वृद्ध, निराधार पुरुष व महिला नी नाव नोंदणी करू शिबिराचा लाभ घेतला. राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा अभियान सेवा शिबीर यशस्वी होण्यासाठी पाथरे येथील कार्यकर्ते अशोक बाबासाहेब घोलप,उमेश घोलप, मंडळ अधिकारी मांढरे, तलाठी संदीप ठाकरे, तलाठी कार्यालयाचे सातपुते, अशोक फणसे, सुनील कडू यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत