राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर येथे स्वयंभू श्री.कणकावती माता नवरात्र उत्सवनिमित्त सोमवार २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत विवि...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर येथे स्वयंभू श्री.कणकावती माता नवरात्र उत्सवनिमित्त सोमवार २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कणगर येथे कणकावती माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त देवी महात्म्य वाचन, कीर्तन, भजन, आरती, प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दि २६ सप्टेंबर रोजी कावड्यांची मिरवणूक व देवीला गंगाजल अभिषेक केला जाणार आहे. याच दिवशी कणकावती आराध्या मंडळ यांचा देवी भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भागवताचार्य ह.भ.प संगीताताई करंजीकर, २८ सप्टेंबर रोजी ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक, २९ सप्टेंबर रोजी ह.भ.प छगन महाराज खडके, ३० सप्टेंबर रोजी गणेश महाराज ओझरकर, १ ऑक्टोबर रोजी ह.भ.प मुक्तानंद स्वामी महाराज, २ ऑक्टोबर रोजी ह.भ.प गणेश महाराज वारंगे, ३ ऑक्टोबर रोजी ह.भ.प लक्ष्मण महाराज पाटील, ४ ऑक्टोबर रोजी ह.भ.प संजय महाराज शेटे यांची कीर्तने संपन्न होणार आहे.
मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प उमेश महाराज किर्दत यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे. नवरात्र होमहवन ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३ प्रवीण व प्रकाश गुरू नवले यांच्या अधिपत्याखाली पार पडणार आहे.
या नवरात्र सप्ताहसाठी संत पूजन करणारे मान्यवर, दररोजचे अन्नदाते, महाप्रसाद अन्नदाते, देणगीदार, ग्रामस्थ, टाळकरी, वारकरी, कीर्तनकार आदींचे सहकार्य लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन स्वयंभू श्री.कणकावती माता नवरात्र उत्सव मंडळ, समस्त भाविक व कणगर ग्रामस्थ यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत