राहुरी फॅक्टरीच्या अँड.सविता ठाणगे यांची विशेष सहायक अभियोक्तापदी निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या अँड.सविता ठाणगे यांची विशेष सहायक अभियोक्तापदी निवड

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) नगर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयामध्ये न्यायालयीन खटल्यांचे कामकाज पाहण्याच्या दृष्टीने २३ वकिलांची विशेष सहाय्यक सर...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

नगर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयामध्ये न्यायालयीन खटल्यांचे कामकाज पाहण्याच्या दृष्टीने २३ वकिलांची विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी (दि. २०) ही निवड यादी जाहीर केली आहे. यामध्ये राहुरी फॅक्टरी येथील अँड.सविता गांधले- ठाणगे यांची निवड करण्यात आली.


विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता निवड समितीच्यावतीने सोमवारी (दि. १९) या पदासाठीच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीसाठी जिल्ह्यातून ८० उमेदवार उपस्थित होते. निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या निवड समितीने या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीत पात्र ठरविण्यात आलेल्या २३ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करत त्यांची विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदी नेमणूक करण्यात आली आहे.


विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड झालेले उमेदवार असे नागरे अभिषेक प्रमोद, चव्हाण सागर हरिचंद्र, शेळके राहल विठ्ठल, श्रीमती एखंडे (वर्षे ) पायल भास्कर, श्रीमती लवांडे वाकचौरे शोभा यादवराव रणधिर प्रदिपकुमार धोंडीबा आवेस अब्दुल रहेमान, श्रीमती कोठारी रेणू राजेश, श्रीमती वावर (वायकर ) सुचिता आनंद, वाडेकर धैर्यशिल लक्ष्मणराव, श्रीमती बाबर आशा वसंत, बागवान तौसिफ मुस्ताक, पटेकर संचिन अशोक, श्रीमती रोहमारे (तोडरमल) प्रतिक्षा सुहास, श्रीमती गांधले (ठाणगे) सविता सोन्याबापु श्रीमती चिंतेवार शिल्पा भिमराव भोसले गौरव अशोक, श्रीमती सेलोत अर्चना मंगलेश, श्रीमती कुंजर भाग्येश्री शंकरराव, दांगडे संतोष रामकृष्ण, शेख शबाना बनेसाब आदींचा समावेश आहे.


राहुरी न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून विधीज्ञ म्हणून काम करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील अँड.सविता गांधले- ठाणगे यांची निवड करण्यात सरकारी अभियोक्ता या पदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सविता गांधले-ठाणगे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत