राहुरी फॅक्टरी/वेबटीम;- देवळाली प्रवरा शिवसेना शहराध्यक्षपदाचा सुनील कराळे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने शहरात चर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम;-
देवळाली प्रवरा शिवसेना शहराध्यक्षपदाचा सुनील कराळे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या राजीनाम्याने ते शिवसेनेच्या शिंदे सेनेत जाण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कराळे यांनी सांगितले, माझ्या वैयक्तीक अडचणीमुळे पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा दिला आहे. मंजूर करणे न करणे हा त्यांचा प्रश्न आहे. मी गेली २० वर्षे शिवसेना शहराध्यक्षपदाची प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळली. प्रस्थापितांसमोर वेळोवेळी कडवे आव्हान उभे केले. जरी राजीनामा दिला असला तरी एक शिवसैनिक म्हणून मी सदैव कार्यरत राहणार असल्याचे कराळे यांनी सांगितले असले, तरी याबाबत पक्षांतर्गत वादाची चर्चा आहे.
गेली वीस वर्षे कराळे यांनी शिवसेना वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना कधीच विश्वासात घेतले नाही. देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्यासाठी देखील त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. तत्कालीन महाआघाडी सरकार असताना देखील हा प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांच्या मनात याबाबत खंत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.
याबाबत बोलताना कराळे म्हणाले, माझ्यासोबत सेनेचे इतरही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. भविष्यात काय भूमिका असेल ? यावर ते म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या ? असे सूचक विधान त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत