सात्रळ (वेबटीम) सध्या गणेशउत्सवाची धामधूम सगळीकडेच पाहावयास मिळत असून भव्य, दिव्य आकर्षक असलेल्या गणेश मूर्ती पाहावयास मिळत आहेत. या मू...
सात्रळ (वेबटीम)
सध्या गणेशउत्सवाची धामधूम सगळीकडेच पाहावयास मिळत असून भव्य, दिव्य आकर्षक असलेल्या गणेश मूर्ती पाहावयास मिळत आहेत. या मूर्ती कश्या तयार बनतात , रंग रंगोटी साठीची पेंटिंग , कलाकुसर या सगळ्याची माहिती मिळविण्याच्या जिज्ञासा मुळे येथील श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थिनींनी आपल्या वर्गशिक्षिका शिंदे व दिघे मॅडम समवेत येथील महिला उद्योजक व मूर्तिकार स्वाती विश्वासे यांच्या गोरोबा आर्टस् या गणपती व इतर मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यास भेट देऊन मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कच्चा माल तयार करणे, साच्यात भरणे तसेच रंगविषयी माहिती,मूर्ती आकर्षक दिसण्यासाठी सजावट इत्यादीची माहिती महिला मूर्तिकार स्वाती विश्वासे यांच्या कडून घेतली. विशेष म्हणजे महिला मूर्तिकाराकडून मिळालेली ही कला व त्याचे महत्व मुळे विद्यार्थिनी अचंबित होऊन पुढील वर्षी गणेश मूर्ती स्वतः च्या घरीच बनविण्याचे मानस बऱ्याच मुलींनी बोलून दाखविले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत