राहुरी फॅक्टरी(वेबटीम) अहमदनगर येथील रसाळ नेत्रालय व राहुरी फॅक्टरी येथील श्री ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
अहमदनगर येथील रसाळ नेत्रालय व राहुरी फॅक्टरी येथील श्री ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते १ यावेळेत मोफत नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात नेत्र शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील श्री ऑप्टिकलच्या प्रथम वर्धापनदिन व शिक्षक दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी बस स्टँड येथील अनिल कॉम्प्लेक्स येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर व सवलतीच्या दरात नेत्र शस्त्रक्रिया शिबीर ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १ या वेळत संपन्न होणार आहे.
या शिबिरात मोतीबिंदू, काचबिंदू व डोळ्यांच्या इतर आजारावर शस्त्रक्रियेचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेत्रतज्ञ डॉ.प्रकाश बळवंत रसाळ (M.B.B.S, D.O.M.S, F.G.O) हे तपासणी करणार आहेत.
शिबिरात मोतीबिंदू, काचबिंदू, काळ्या बाहुलीवरील मास वाढणे, डोळ्याचे ट्यूमर, लहान मुलांमधील डोळ्यांचे आजार, तिरळेपणा,पापणीचे आजार, लासूर, डोळ्यांच्या सौंदर्यविषयक समस्या व आजार याबाबत तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरात नाव नोंदणी केलेल्या रुग्णांची सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तरी गरजू रुग्णांनी नावनोंदणीसाठी ८८०६८०४८५०,७७७३९२४०४२ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत