राहुरी(वेबटीम) वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे निषेधार्थ राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे...
राहुरी(वेबटीम)
वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे निषेधार्थ राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांना आरपीआयच्या वतीने निवेदन देण्यात आल आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे उपप्रदेश अध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण हे गेले 30 ते 35 वर्षापासून आंबेडकर चळवळीत सक्रिय सहभागी असून त्यांनी नेहमीच अन्य अत्याचारविरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं असल्याने केवळ त्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल केले आहेत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंबेडकर चळवळीतील कोणत्याही गटातटाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले कदापि खपवून घेतले जाणार नाही.शेवगाव येथील पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केवळ आकाशापोटी खोटे गुन्हे दाखल केली असून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून सदर गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विलास साळवे, सुनील चांदणे, सिद्धांत सगळे, स्नेहल सांगळे, आयुब पठाण, रवी साळवे, सलीम शेख, बाळासाहेब पटांगळे, सुनील चांदणे, साळवे बाबुराव आधी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत