देवळाली प्रवरा(वेबटीम) माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचा आणि शिक्षकांचा ऋणानुबंध वाखाणण्यासारखा असून गेल्या पंचवीस वर्षापासून प्रत्येक शिक्षक...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचा आणि शिक्षकांचा ऋणानुबंध वाखाणण्यासारखा असून गेल्या पंचवीस वर्षापासून प्रत्येक शिक्षक दिनी कदम हे राहुरी तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.
माजी आमदार कदम हे आपल्या शाळेत शुभेच्छा देण्यासाठी येणारच अशी भावना शिक्षकांची होऊन ते त्यांची वाट पाहत असतात आज सकाळीच अनेक शिक्षकांचे फोन खणखणले व मी माजी आमदार चंद्रशेखर कदम बोलतोय गुरुजी तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्यामुळे राष्ट्र उभे राहिले तुम्ही खऱ्या अर्थाने समाज घडविणारे अभियंता आहात, तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो व सुयशचिंतितो अशा शुभेच्छा अनेक शिक्षकांच्या कानावर पडल्या.
गेल्या पंचवीस वर्षापासून माजी आमदार चंद्रशेखर कदम हे फोनवर व प्रत्यक्ष जाऊन शिक्षकांना शुभेच्छा देत आले आहेत आज देखील त्यांनी न चुकता राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल ,संत ज्ञानेश्वर विद्यालय टाकळीमिया, केशव गोविंद विद्यालय बेलापूर, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले गुलाब पुष्प शाल श्रीफळ देऊन शिक्षक बांधवांचा सत्कार केला.
पंचवीस वर्षापासून न चुकता हा उपक्रम करणारे कदम हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत अशा शिक्षकांच्या भावना आहेत.
सत्तेत असताना देखील चंद्रशेखर कदम मुंबई अथवा बाहेर कुठेही असले तरी शिक्षक दिनाच्या दिवशी ते आपल्या देवळाली शहरात येऊन राहत असत ,शिक्षक दिनी प्रत्येक शाळेवर जाऊन व दिवसभरात शाळेवर जाऊन किंवा दूरध्वनीवरून शिक्षकांना शुभेच्छा देत असत,आज देखील त्यांच्या या शुभेच्छांचे शिक्षक वाटच पाहत असतात अशी चर्चा शिक्षक बांधवांमध्ये आज दिवसभर होती आज नाजी आमदार कदम यांचे सोबत देवळाली प्रवराचे माजी नगर अध्यक्ष गोरख मुसमाडे ,व्हिजन इंडिया सर्व्हिसेसचे संपादक गणेश अंबिलवादे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे व मच्छिंद्र कदम उपस्थित होते.
एकीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी नुकतीच शिक्षकांच्या घर भाडे भत्त्यावर शिक्षक मुख्यालय राहत नसल्याने प्रचंड आग पाखड केली होती त्याबद्दल राज्यभर शिक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या अनेक शिक्षकांनी फोन करून आमदार बंब यांना चांगलेच सुनावले होते या उलट मात्र माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या कृतीतून शिक्षकांप्रती प्रकट झालेला स्नेहभाव गेली 25 वर्षापासून सुरू आहे कदम यांच्या हा शुभेच्छा यज्ञ आमदार बंब यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष शेळके यांनी व्यक्त केली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत