नगर मनमाड महामार्गच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर मनमाड महामार्गच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा

  राहुरी(वेबटीम) रस्ता अपघातात तरुणाच्या मृत्यू झाल्या प्रकरणी जय हिंद रोड बिल्डर ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मा...

 राहुरी(वेबटीम)



रस्ता अपघातात तरुणाच्या मृत्यू झाल्या प्रकरणी जय हिंद रोड बिल्डर ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.


अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी नगर मनमाड रोडवर भुजाडी पेट्रोल पंप राहुरी येथे सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान अजय कारभारी बोरुडे वय 28 या तरुणाचा रस्त्यावरील खड्डा चुकवताना कडेला असलेल्या उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला. या संबंधी वेळोवेळी संबंधित विभागाकडे लेखी तोंडी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती दिनांक 15 ऑगस्ट ची नगर मनमाड रस्ता बंद करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यावेळी राहुरीचे तहसीलदार यांनी दिनांक 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व आंदोलन करते यांची बैठक घेऊन तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करत आहोत असे सांगितले होते परंतु जय हिंद रोड बिल्डर्स या ठेकेदाराला काम देण्यात आलेले होते त्या ठेकेदाराने दिनांक 15 ऑगस्ट पासून नांदगाव तालुका नगर येथे काम चालू असल्याचे सांगत आहे मुळात 15 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2022 पर्यंत वीस दिवसात अगदी संत गतीने काम केले त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केली या दरम्यान रस्ता अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाला आहे सदर रस्ता दुरुस्ती करणाऱ्या जय हिंद रोड बिल्डर्स कंपनीच्या हलगर्जरी हलगजरीपणामुळे रस्त्यावरील खड्डा चुकवितांना खुल्या नाल्यात पडून अजय कारभारी बोर्डे वय 28 याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे संबंधित जय हिंद रोड बिल्डर्स कंपनीच्या ठेकेदारावर रोडचे काम घेतल्यापासून दिनांक पाच सप्टेंबर 2022 पर्यंत जेवढे अपघात झाले त्यांचा दोषी धरून सदोष मनुष्यवादाचा व इतर कायदेशीर दृष्टीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनावर देवेंद्र लांबे, राजेंद्र लबडे, सतीश घुले, शरद म्हसे, आकाश साबळे, सचिन चौधरी, अमित पाटील ,मंजाबापू कोबरणे, किशोर कोबरने, अविनाश शिरसागर, जालिंदर कोहकडे, एडवोकेट गोविंद तनपुरे, राजेंद्र बोरुडे, राजकुमार आघाव ,ऋषिकेश देवरे आदींच्या सह्या आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत