राहुरी(वेबटीम) राहुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसिलदार शेख यांना निवेदन दिले असून या निवेदनात म्हंटले की, सोशल मीडियावर एखाद्या प...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसिलदार शेख यांना निवेदन दिले असून या निवेदनात म्हंटले की,
सोशल मीडियावर एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची बदनामी करणे. देशातील धर्माबद्दल पंथाबद्दल किंवा महापुरुषाबद्दल समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकणे. भारतीय तिरंग्याचा अपमान करणे भारतीय राज्यघटनेचा तिरंग्याचा किंवा देशाच्या विरोधात एखादे कृत्य करणे. या संदर्भातली पोस्ट सोशल मीडियावर जर व्हायरल झाली तर संबंधित ग्रुप अॅडमिन वर किंवा त्या व्हिडिओमधील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यासाठी देशांमध्ये सायबर क्राईमचे पोलीस काम करत असतात.
परंतु सध्या सोशल मिडीयावर भारतीय संविधानाशी द्रोह करून हिंदू राष्ट्राचे संविधान निर्माण करून हिंदू राष्ट्राची निर्मिती होईल अशा आशयाचा एक व्हीडीओ सोशल मिडीयावर फार व्हायरल होत आहे. तरीदेखील सायबर क्राईमचे पोलिस अधिकारी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकणा-या व्यक्तींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही. या व्हिडीओ मध्ये सांगितल्याप्रमाणे मुस्लिमांना व ख्रिश्चनांना मताचा अधिकार मिळणार नाही. संसदेऐवजी धर्म संसद असणार. देशातील एकूण धर्मापैकी फक्त हिंदू धर्माप्रमाणेच देश चालवला जाईल. मनुस्मृतीतील चातुवर्ण म्हणजेच १. ब्राम्हण, २. वैश्य ३. क्षेत्रिय, ४. शुद्र या विषमतावादी मानसिकतेवर हिंदू राष्ट्र चालविले जाईल.
आजमितीला विद्यमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ, जाती-जमाती यांना समान मानून देशाचा कारभार चालतो. परंतु हिदू राष्ट्राची कल्पना मांडून विषमतावादी, धर्मवादी धोरणामुळे देशातील इतर धर्मातील, पंथातील जाती-जमातींना हे हिंदू राष्ट्राचे संविधान मान्य नाही. यामुळे हिंदू राष्ट्राच्या संविधानाला देशातील सर्व भारतीय करारून विरोध करतील. व अशा कृतीमुळे देशाचे तुकडे होतील. म्हणून हा व्हिडीओ व्हायरल करणा-या ग्रुप अॅडमिनवर व या व्हिडीओ मधील भारतीय संविधानाशी गद्दारी करून (द्रोह) हिंदू राष्ट्राचे नवीन संविधान तयार करण्याची जबाबदारी देणा-या पुढील व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. १. स्वामी आनंद स्वरूप कामेश्वर उपाध्याय २. सप्रीम कोर्टाचे वरिष्ठ आधिव्यकता व्ही. आर. रेडडी ३. रक्षा विशेष तज्ञ आनंद वर्धन ४. सनातन धर्माचे दिवान चंद्रमणी मिश्रा, ५. डॉ. विद्यासागर विद्यमान भारतीय संविधानाशी द्रोह करणा-या व्यक्तींवर महामहीम राष्ट्रपतींनी गुन्हे लवकरात लवकर दाखल करावे.
देशद्रोहाचे संविधानाच्या विरोधात चुकीची मानसिकता निर्माण करुन देशामध्ये अराजकता पसरवली जात आहे. तरी सायबर क्राईम पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही. म्हणून कर्तव्यात कसूर करणे या कलमाअंतर्गत सायबर क्राईमच्या पोलिस अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
देशद्रोहाचे संविधानाच्या विरोधात चुकीची मानसिकता निर्माण करुन देशामध्ये अराजकता पसरवली जात आहे. तरी सायबर क्राईम पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही. म्हणून कर्तव्यात कसूर करणे या कलमाअंतर्गत सायबर क्राईमच्या पोलिस अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
देशद्रोहाचे गुन्हे लवकरात लवकर दाखल करावे. तसेच सोशल मिडीयावर राज रोषपणे संविधानाच्या विरोधात चुकीची मानसिकता निर्माण करून देशामध्ये अराजकता पसरवली जात विद्यमान भारतीय संविधानाशी द्रोह करणा-या व्यक्तींवर महामहीम राष्ट्रपतींनी आहे. तरी सायबर क्राईम पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही. म्हणून कर्तव्यात कसूर करणे
पोलिस अधिका-यांवर कार्यवाही करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याच्या म्हणून वरील संविधान द्रोही व्यक्ती व कर्तव्यात कसूर करणा-या सायबर क्राईम वतीने कारवाई करावी यासाठी राहरी तहसिल कार्यालयासमोर दि. ०६ सप्टेंबर २०२२ रोजी ठीक ११:३० वाजता संबंधित व्हिडीओ मधील व्यक्तींवर व अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी प्रशासनाचा निषेध म्हणून एकदिवशीय घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा महासचिव अनिल जाधव, तालुका महासचिव संदीप कोकाटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षा बाचकर, जिल्हा संघटक निलेश जगधने, राहुरी शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, देवळाली शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, शहर उपाध्यक्ष नानासाहेब उंडे, मार्गदर्शक अशोक मुसमाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत